Sunday, August 31, 2008

मी...शोधते काही बकरे!

निवांतवृत्तीने मी एकदा वॉलमार्टातून खरेदी करत असताना, हे देसी कुटुंब स्वत:हून माझ्यापुढे येवून थांबलं, आणि गप्पा मारायला लागलं. मला कोण आनंद झाला होता. :-) मी "अमक्याची तमकी" का? अशा प्रश्नाने गृहस्थांनी सुरुवात

केली. मी "नाही" म्हटले, पण त्यामुळे काही फ़रक पडला नाही, आणि आम्ही पुढे ओळख वाढवायच्या गप्पा सुरु ठेवल्या. त्या ओळख निघण्याचा 'रॉंग-नंबर' निघाल्यानंतरही हे कुटुंब प्रेमाने पुढे बोलत राहिल्याने, आणि त्यांनी मला 'कट' न मारल्याने मला फ़ार बरं वाटलं होतं!

मग यथासांग फोन नंबर आणि इ-मेल ऍड्रेसेस चे आदानप्रदान करून आम्ही निरोप घेतले. दुसऱ्या दिवशी त्यांचा स्वत:हून मला फोन आणि इ-मेल ही आले! मला त्यांची आत्मियता पाहून फ़ार भरून आलं होतं. (तसं त्यांनी मला बोलावण्या ऐवजी "आम्ही येतो" असं म्हणणं वेगळं वाटलेलं, पण ते आश्चर्य मी लगेच झटकून टाकलं.) ते कुटुंब आल्यावर कसं स्वागत करायचं याचे बेत सुरु केले. ठरल्या वेळेच्या आधीपासून मी वाट पाहिलेली, आणि कांदा-पोहे; आलं घातलेला चहा (हे काही फ़ार नाही, तरी) मनापासून केलेलं. ते आले, गप्पा झाल्या. मला नवे मित्र-मैत्रीण मिळाल्याचा फ़ार आनंद झाला होता.

मग त्याने एम.बी.ए. केल्यावर इथे मान्यवर कंपनीत नोकरी करता-करता कसा स्वत:चा बिझनेस सुरु केलाये हे सांगितलं. इथे असे सुमारे १५० देसी सोबत मिळून हा इ-कॉमर्स चा बिझनेस करत आहेत, आणि यातले सगळे आय.आय.टी., आय.आय.एम. अशा मान्यवर संस्थेतून उच्च शिक्षण घेतलेले आहेत, हे कळलं.

मला लय भारी वाटत होतं. अमेरिकेत येवून शिकून, नोकरी करून, मग स्वत:चा बिझनेस सुरू करून करोडपती झालेल्या देसींच्या सुरस आणि चमत्कारिक कथा मी ऐकलेल्या, वाचलेल्या होत्या. अशाच भारलेल्या १५० जणांच्या ग्रूपच्या एकाशी मी प्रत्यक्षात बोलत होते! आपल्यालाही किती काही यांच्याकडून शिकायला मिळेल या स्वप्नांत मी लगेच रमले. आश्चर्याची गोष्ट
अशी, की त्यांनी लगेच मला १५१ वी पार्टनर बनण्याची ऑफ़र दिली, आणि एका मीटिंगलाही बोलावलं. :-)हरखून जाणं काय असतं ते मी अनुभवत होते.

मीटिंगमध्ये त्या कंपनीचा प्रमुख प्रेझेंटेशन देणार होता. मी माझा एकुलता एक अती-फ़ॉर्मल ड्रेस धुवून इस्त्री करून घालून तयार झाले. आम्ही सोबत तिथे गेलो. एका देसी च्या फ़्लॅट मध्ये अनेक देसी जमून एकमेकांशी अतिशय आदबीने बोलत उभे होते. मग प्रेझेंटेशन सुरु झालं. प्रमुखाने बिझनेस म्हणजे काय, तो कसा करावा, त्यातले प्रमुख धोके काय, अशी छान सुरुवात केली.

माझ्यासारख्या निर्बुद्धला असं बेसिकपासून समजावून सांगणारे फ़ार आवडतात. मी लक्षपूर्वक ऐकत होते. मग त्याने बिल गेट्स श्रीमंत कसा झाला, आपण कसे आणि का व्हावे हे खुसखुशीत उदाहरणांसह सांगितले. विनोद बरे होते. पण नर्म विनोदांनाही मागच्या रांगेतून खूप (तरीही आदरयुक्त) हशा आणि टाळ्या मिळत होत्या. (मला पुढे बसवण्यात आले
होते.) आम्ही पुढचे २०/२५ जण मात्र माफ़क हसत होतो. मग प्रमुखाने इ-कॉमर्स म्हणजे काय, आणि २०० डॉलर्स च्या भांडवलानेही हा व्यवसाय कसा सुरु करता येतो हे सांगायला सुरुवात केली. आता आम्ही पुढचे सरसावून बसलो. (मागून वाहवा चालूच.) २ स्लाईड्स नंतर प्रमुख मुद्द्यावर आले. आणि एक ई-बे, ऍमॅझॉन सारखे ऑनलाईन-शॉपिंगचे पोर्टल आहे,
त्याचा टेक्निकल पार्ट करून तयार आहे, मॅनेजमेण्ट इन-प्लेस आहे. पण या पोर्टल ला जाहिरातीवर पैसे खर्च करायला आवडत नाहीत, म्हणून त्यांनी ह्या (आणि अशा अनेक) १५० बिझनेसमन्स (आणि वूमेन्स) ना काम सोपवलं आहे, प्रत्येकाने १० नवीन बिझनेसमन / वूमेन मिळवायचे, मग त्या १० नी पुढचे १००. आता ह्या सर्व मेंबर्सनी त्या वेबसाईट वरून जेवढे जमेल तेव्हढे शॉपिंग करायचे, म्हणजे त्यांचे बोनस पॉईंट वाढतील. आणि मग तुम्ही सिल्व्हर, गोल्ड, प्लॅटिनम मेंबर होत जाल.

ह्या स्लाईड नंतर माझा मूडच गेला. सिनेमातली हिरॉईन जशी कुंकू पुसून टाकते, तसं मला लिपस्टिक पुसून, इन केलेला शर्ट उपसून, अंगावरच्या कपड्यांना चुरगळून त्यांची इस्त्री घालवायची तीव्र इच्छा झाली. प्रेझेण्टेशन झाल्यावर सर्व प्लॅटिनम मेंबर्स चा सत्कार झाला. त्यात मला भेटलेले सद्कुटुंबही होते. शेवटी एक डी.व्ही.डी. दाखवण्यात आली, ज्यात ह्या बिझनेसच्या मर्गाने श्रीमंत झालेल्या एका देसी कुटुंबाचा आलीशान महाल आणि गाड्या आतून-बाहेरून दाखवण्यात आल्या. ते पाहून आम्हीही प्रेरित व्हावं असा उद्देश असल्याचं ऐकून मला भडभडून ओकारी येत होती (पण तिथे बादली ठेवलेली नव्हती, आणि उगाच दुसऱ्याच्या हॉलमधे नको म्हणून मी मोट्ठा आवंढा गिळला.) सर्व झाल्यावर इन्फ़ॉर्मल गप्पांच्या वेळी कळाले, की मागे बसलेले आधीच बिझनेस मन / वूमन होते. पुढे बसलेले २०/२५ जण नुकतेच देस सोडून इथे आलेले होते. त्यातला एकही २ महिन्यांपेक्षा इथे जुना नव्हता. आणि सर्वांना बागेत / स्टेशनवर / वॉलमार्टमधे / दुकानांत प्रेमळ देसी कुटुंबे भेटली होती! प्रेझेण्टेशन नंतर या सर्व २५ जणांचे चेहेरे मागे एकदा सांगलीतल्या एका खाटिकखान्यात पाहिल्यासारखे वटायला लागले होते. सर्व सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम बिझनेसमन एकमेकांची तारीफ़ करताना थकत नव्हते. "तुम्हाला इथे कोण घेवून आलं?" या प्रश्नाला काहीही उत्तर दिलं, तरी "वा! डोण्ट वरी! यू आर इन सेफ़ हॅण्ड्स" असं उत्तर मिळत होतं. सर्वांच्या चेहेऱ्यावरचे भाव इतके तुपकट आणि आर्जवी होते की मी एखाद्या साधुबुवाच्या आश्रमात आले आहे असं वाटत होतं. तोच सद्भाव, तोच आदर,
तीच दृढश्रद्धा.

असा बिझनेस जॉईन करण्यापेक्षा कारकूनी बरी हा माझा विचार पक्का होता. कुणाचे घरच्या अडचणींनी, किंवा कुवत कमी असल्याने, शिक्षण कमी झाले असेल, अशा व्यक्तीने अशी एजन्सी घेवून ४ पैसे कमावले, तर मी त्याचं कौतुकच करते. कांना भेटणे, नेटवर्क वाढवणे, आणि पैसे कमावणे हे वाईट नाही. पण भारतातून लाखो रुपयांच्या सबसिड्या मिळणाऱ्या मोठ्या संस्थांमधून शिक्षण घेतलेले हे उच्चविद्याविभूषित देसी परदेशात एकीकडे मानाची नोकरी करत असताना, फ़क्त आणखी पैसे मिळावेत म्हणून अशा एजन्स्या घेवून सेल्समन सारखं काम करतात, स्वत:ला बिझनेस मॅन, वूमन म्हणवून घेतात; आणि वॉलमार्टमध्ये नवख्या दिसणाऱ्या देसीना पकडून बकरे बनवतात, ह्या विचारांनी भणभणायला झालं.

माझे परममित्र सद्कुटुंब आता मला घरी सोडवायला येणार, तर मी हसून "नको, मी जाते" असं म्हटलं. समक्ष, किंवा फोनवर "नाही" म्हणायचा सडेतोडपणा अजून माझ्यात आलेला नसल्याने, मी नम्रपणे इ-मेल ने सद्कुटुंबाला कळवलं, "मी आयुष्यात कधी बिझनेस केला, तर त्यातून माझ्या अपेक्षा असतील की, (१) बिझनेस करताना त्या ह्यूज चॅलेंजला सामोरं
जाण्याची एक्साईटमेण्ट, (२) माझ्या शिक्षणाचा आणि कमावलेल्या स्किल्सचा लागणारा कस (३) माझ्या आल्मामेटर (शिक्षण-संस्था) ची गर्वाने मान उंच होणे (४) आणि थोडे पैसेही मिळणे (अगदीच आतबट्याचा व्यवहार व्हायल नको, इतपत).

तुमच्या इ-कॉमर्स च्या बिझनेस मधे यातले पहिले ३ फ़ायदे नसल्याने मी तो करू शकणार नाही, मला कृपया क्षमा करावी." इ-मेलच्या उत्तरात सद्कुटुंबाने कधी इ-मेल किंवा फोनही केला नाही.

त्यांनी लगेच गाडीने वॉलमार्ट गाठले असावे!

मी मात्र इ-मेल पाठवल्यावर मोट्ठा सुस्कारा सोडला... मनात आलं, मी जर हा बिझनेस जॉईन केला असता, आणि ह्याचे डिटेल्स कळवले असते, तर माझ्या तिशीला झुकलेल्या वयाची, किंवा आजूबाजूच्या लोकांची तमा न बाळगता, वालचंदच्या कॉम्प्युटर डिपार्टमेण्टच्या आमच्या देसाई बाईंनी माझ्या कानफ़टाखाली ज्जाळ काढला असता!

- अनामिका

17 comments:

Unknown said...

This is called as "Chain E-Commerce Scam" and I have seen this in Japan and also very recently in India.

The products they sell on these so-called sites are so hugely over-inflated due to commissions only that even once your first customer buys it (I doubt someone will), they will understand that they have been cheated.

In the end, you are the big looser if you put money in this scam and the 3 levels before you start earning when either they sell the chain to forth level or either you buy some so called products.

In Tokyo, this chain was run most surprisingly by one of my close business friends and I realized the threat immediately. In Pune, a close friend of mine has started doing this (his wife does this) and I am worried on two counts, 1. How gullible the middle classes are for owing a business but lack the min fore-site of this lady (which I salute) and 2. Are there not any Government agencies who can find out what are these chain-marketing guys and gals doing and reprimand the TOP level cheats (whosoever who started it in first place) and not those like my friend's wife who try to invest initially due to a big mistake and then try to sell some stupid products to each visiting friend.

Of late, we even cut of phone calls from this friend of mine or his wife. Every time they come home, they start praising how good their medical products are and we just start yawning.

I appreciate eSakal for bringing this letter into public and on this blog so that many can share their views (hopefully no one saying Good about it) on this social ill and only a firm will of eSakal readers and all other people can deter such scams and stop buying from scam-sters in future.

Anonymous said...

Anamika ni hey khup changla lihilay. Ase loka amhala pan ekda airport var bhetle hote tenvha amhi tyanna olkhu shaklo nahi pan ata walmart madhe koni bhartiye jar (swatacha nehmicha tusada swabhav bajoola theoon) ugach salagi dakhvayla lagla tar lagech lakshat yete. pan asa hee hou shakata ki pratyek salagi vadhavnarya bhartiya kade apan tyach drushtini pahoo lagto.

Vinita

Anamika Joshi said...

एक्झॅक्टली!
आणि माझ्या ह्या पोस्टमध्ये लिहीलेल्या अनुभवात तर कंपनीचे नाव क्विकस्टार असे होते; आणि मला नंतर समजले की त्यांची खरंतर काहीही प्रॉडक्टस नाहीचेत. प्रत्येक नवीन बकरा/बकरी कडून ते २०० डॉलर्स रजिस्ट्रेशन फी घेतात, आणि ते पैसेच चेन मधले वरचे मेंबर्स वाटून घेतात. तोच त्यांच्या कमिशनचा आणि ह्या बिझनेसच्या उत्पन्नाचा मुख्य आणि एकमेव सोर्स असतो! आणि हे बकरे शोधणारे इतके पॅशनेटली हा उपद्व्याप करतात की अगदी त्यांना रोग लागला असावा. त्यांचे मुख्य करीयर आणि पर्सनल लाईफ कसे उरले असेल हा विचार करून कीव येते.
माझे पोस्ट प्रकाशित केल्याबद्दल ई-सकाळचे आभार!
--अनामिका जोशी.

ashu said...

Hi Anamika,

Firstly, sorry about not typing in marathi, but, i dont know how.

Very nice post and well written too.

I was just curious about a small detail that stood out for me: why use the hindi word "desi" when the marathi word "deshi" would have worked equally well?

Thanks again.

Anonymous said...

I had faced similar situations in US. This dude met me at Kmart and said he is from IIT, Mumbai. Called me the very next day and told me about Quixstar. I threatened him saying that my neighbor is in law and enforcement dept and I am going to complain about you to him. This dude hung up the phone and never called me.

Anonymous said...

Thanks for sharing this story.

Me and my family had this experience couple of times in Dallas and Columbus. Not sure which company they belong to but were very good in catching your nerve. When you are new to US, definitely you feel very good when someone comes and talks to you in Indian store or Walmart etc.

Lot of people around us are into it, not sure whether everybody makes money or not...but definitely this is something which is not good at all.

Anonymous said...

Hi !
I have had the same experience when I was in Chicago. I knew there was something wrong about these people( Why would an IITan do some things like this!) but that guy forced me to take a ride in his car to my home.(I did not have a car that time)He then came once or twice and tried to convince me about the e-commerce thing. I am stil avoiding him whenever possible!

Anonymous said...

Here is a free book, by someone who had risen to highest levels (Emerald level) in Amway/Quixtar. After working for a decade, wanting a better life, sacrificing family-time to make just a little more money, only to discover that Amway/Quixtar is abusive and deceptive.

http://www.merchantsofdeception.com

Anonymous said...

What always strikes me, is that these people are very reluctant to reveal their company name(Quixtar/Amway).
Why would any company hide it's name?

Anonymous said...

I too had this experence in MA. One of the persons met me, told, he has MBBS degree, but he and his wife are in this business since they make good money and it is a good chance to meet people ...:)

Unknown said...

Hey Anamika Khupach chan shabdaat lihile aahes... perfect asach anubhav magchya mahinyat me Dubaimadhye ghetla.. fakt tikade $200 hote tar ikade 600 hote... aani tya nalayak mansani aamchya Jummyachya sutticha radha diwas khalla... agdi shame to shame aamhala pudhe basa mhanun sangnyaat aale.. aani evdhi mothi mothi swapne dakhavli.. jya sadgruhasthane aamhala tikade nele hote... tyane tar sangitale ki tyane swataha tyacha 18 warsha chalalela Dimond cha wyavsaay band karun ha wyavsaay chalu kelay.. tuzyasarkhech mazya Kaarkuni manala te patle nahi.. farak evdhaach me tyachya tonadavar sangitale.. Jamnaar nahi mhanun..

Anonymous said...

Well...its really frustrating when you experience something like this. I met so many such 'professionals', that I started enjoying a debate with them! You may try this out only if you are bored for two minutes!

Although I never became member of this agency. Here are typical questions these people ask (and possible answers to them!):

* What would you do if you get million dollars?
Answer: Distribute it to charities.

* Don't you think you should save money for your children?
Answer: No. I think my children should earn money when they grow.

* What's your aim in life?
Answer: Moksha!

* Why are you working when you can earn lot of money by becoming partner of this business?
Answer: Work is God! So, I don't want to earn lot of money if I am getting it without working. By doing that I am going away from my God!

* When you buy something from this web site you get 2% commission as money back.
Answer: I always touch and feel the product before buying...so never ever bought anything from web site. I am ready to pay 10% more price if I can get the product in person!

Believe me, you will meet such many people all over the world. You may not even know that some of your friends or even relatives are doing this 'business'.

So, next time when you meet someone like this, take it easy and enjoy the conversation.

Anonymous said...

Anamika,

Congrats for bringing the topic in here. I am a student studying in U.S. and I was so irritated by these people. They just don't leave you alone. Myself with one other friend have been to one of these conferences and, believe me, it was extremely artificial and irritating.

Nikhil

Ravindra Thakare said...

खर म्हणजे मी जेव्हा भारतातुन इथे अमेरिकेत आलो तेव्हाच मला मा़झ्या सहकार्‍र्यांनी या लोकांपासून सावध रहायचा सल्ला दिला होता. पण हे लोक एकदम निर्लज्ज असतात हो. मला ही असाच एक भाउसाहेब "हाय हाउ आर यू?" म्हनत भेटला आणि काय काम करतो, कुठे काम करतो, फॅमिली कुठे आहे वगेरे विचारल्यावर त्याची गाड़ी "तुमचा नम्बर काय" वर आली. मीही काही विचार न करता त्याला नम्बर दिला आणि नंतर त्या भुताचा पीछा सोडवता सोडवता नाकि नऊ आले. कारन नसताना काहीही पूर्वसूचना न देता हे लोक घरी येतात आणि २ / २ तास डोकं खातात. फिल्डिंग लावायला त्यांच्या अर्धन्गिनिही पूर्ण तयार असतात.

त्या साहेबा पासून सुटका करताना माझी झालेली फजीती पाहुन एक मित्राने मला कानमंत्र दिला. मग एकदा असाच वालमार्ट मधेच एक जन भेटला. मीही काहीही विचार न करता त्याला माजा नंबर दिला आनी त्यच्या फोनची वाट पाहु लागलो. अगदी ठरल्यासारखा त्याचा फ़ोन आला आणि त्याला म्हणालो "माझी पत्नी मेंबर आहे. मी तिला मदत करतो आणि मी पण नवीन मेंबर शोधतो आहे." मात्रा एकदम लागू पडली. २ मिनिटे इकडच्या तिकडच्या गोष्टी करून त्याने फ़ोन कट केला आणि पुन्हा कधीच फ़ोन केला नाही. बहुदा डायरी तुन माझे नाव खोडून टाकले असावे.

इथे देसी दिसला की तो एक तर नाक तोंड वाकडे करत न बोलता निघून जातो किवा जिभल्या चाटत क्विकस्टार साथी सावज शोधत राहतो. सध्यातरी बरेच दिवस कुणी भेटला नाही. कुणी भेटलाच तर अजुन निर्लज्ज होऊं त्याला विचारेन "मी इथे नवीन आहे. जरा सांगशील का नवीन मेंबर कुठे मिळतील ते?"

Amol said...

एकदम भन्नाट लिहीले आहे, जबरी आवडले. बर्‍याच जणांना स्वत:चे असे अनुभव आठवतील यातून. मध्यंतरी येथे के मार्ट वॉल मार्ट वगैरे मधे अचानक आपल्या शेजारी येउन उभे राहणारे व आपण बघत असलेल्या वस्तूंबद्दल अफाट कुतुहल दाखवणारे देसी दिसले के हे प्रकरण कोठे जाणार हे लगेच लक्षात येत असे :)
मी ऐकलेले काही "ओपनिंग" प्रश्न:
१. तू त्या अमुक कंपनीत होतास का?कोठेतरी पाहिल्याचे वाटते
२. येथे अमुक रोड कोठे आहे? आम्ही नवीन आहोत येथे.
३. Hi, how are you today?
४. (दुकानाच्या एखाद्या आइल मधे, आपण एखादी गोष्ट बघत असताना) That's a great thing, I have tried it

इतरांचे अजून बरेच असतील :)

:)

Anonymous said...

मला भारतात असताना आणि इथे अमेरिकेत आल्यावरही असे नग भेटले आहेत. चेन मार्केटींग करणार्‍या या लोकांची एक खासियत म्हणजे जेव्हा तुम्हाला ते अश्या मिटींग्जना बोलावतात तेव्हा आधी जाम पत्ता लागू देत नाहीत. जर कुणी अशी टाळाटाळ करत असेल तर लगेच ओळखावे की काहीतरी गडबड आहे. मला आणि माझ्या पत्नीला असेच वाल्मार्टमध्ये एक मराठी जोडपे भेटले. मलाही अनामिकासारखाच अनु्भव आला (आस्थेवाईकपणे बोलणे, फोन नंबर, ई-मेल आदान प्रदान, वगैरे). मात्र आमच्या सुदैवाने माझ्या पत्नीने ही गोष्ट तिच्या एका मैत्रिणीला घरी आल्यावर लगेच कळवली आणि त्या मैत्रिणीने आम्हाला सावध केले. हे आम्हाला भेटलेले जोडपे आमच्या भागात या गोष्टीबद्दल चांगलेच कुप्रसिध्द आहे. सांगायलाच नको की दुसर्‍या-तिसर्‍यादिवशीच आम्हाला त्याचा फोन आला. पण आम्ही आधीच सावध असल्यामुळे नाही म्हणू शकलो. मला एक गोष्ट कळत नाही की या लोकांना हे समजत नाही की ते काय गमावत आहेत? माझ्या उदाहरणातील जोडप्याला सर्वजण टाळतात. त्यांना कुठल्याही समारंभात बोलवत नसावेत. मला शंका आहे की त्यांना कुणीही जवळचे मित्र-मैत्रिण उरले नसावेत. काय उपयोग अश्या पैशाचा?

Girish said...

अनामिकाताई,

छानच अनुभव लिहिला आहात.मी अमेरिकेत असताना काही काळ या लोकांच्या मिठास बोलण्याला मी स्वत: फसलो होतो.हे लोक इतके म्हणून नालायक असतात की काही विचारू नका. मुळात ३ डॉलरला मिळणारी वस्तू १५ डॉलरला विकत घेऊन स्वत: मूर्ख बनायचे आणि आपल्यासारखे मूर्ख बनायला तयार असलेले इतर बकरे शोधायचे असे हे गणित आहे.त्यामानाने माझे या प्रकारात आर्थिक नुकसान बेताचेच झाले पण या मृगजळामागे धावत हजारो डॉलरचे नुकसान झालेले लोक मी बघितले आहेत. मला वाटते की जगापुढील महत्वाच्या समस्यांच्या यादीत -- दहशतवाद, भ्रष्टाचार वगैरे मध्ये ऍमवेवाद या नव्या समस्येचाही समावेश करायला हवा.